
मद्यपान करून कार चालकाची कुंभार्ली घाटातील लोखंडी बॅरिकेटला धडक.
चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात एका कार चालकाने लोखंडी बॅरिकेटला धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. अनिल अशोक उमापे (३५, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याची फिर्याद सचिन मधुकर फडतरे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल उमापे हा त्याच्या कारने विजापूर ते गुहागर मार्गाने जात होता. मात्र तो मद्यपान करुन कार चालवत असल्याने कुंभार्ली चेकपोस्ट येथे त्याचा वाहनावरील ताबा सुटून कारने लोखंडी बॅरीकेटला जोरदार ठोकर देऊन अपघात केला.www.konkantoday.com