खेड शहरातील साळीवाडा येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या.

खेड शहरातील साळीवाडा येथील ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अमोल अनंत तांबडे असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याने घराच्या वाशाला दोरीने गळफास लावून घेतला असता पत्नीने तातडीने दोरी कापली. या दरम्यान, तो जमिनीवर कोसळला. त्याला उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. येथील पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button