आर एच पी फाऊंडेशनमुळे दिव्यांग श्रावणी शिंदेला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर. स्वतःचा घरगुती व्यवसाय करण्यास मिळाली चालना.

रत्नागिरी:- सौ.श्रावणी चंद्रशेखर शिंदे.वय ४८ वर्ष.शिक्षण ७वी.मु.पो. गुरुप्रसाद बिल्डींग राउतमाळ,चिपळुण.ता.चिपळुण जि.रत्नागीरी.एकवर्षाची असताना तापात उजव्या पायाला पोलिओ झाला.आईने खुप कष्टाने तिचे संगोपन केले.कारण वडील ती जन्माला येण्याआधीच निधन पावले.भाउ नाही.दोन बहीणी सध्या विवाहीत आहेत.लहानपणी आई उचलुन शाळेत घेवुन जायची आणायची.७ वीपर्यत कसेतरी शिक्षण पुर्ण केले.नंतर घरातच घरकाम करायची.काठी घेवुन गुडघ्यावर हात देवुन चालायची.

२००८ साली श्री.चंद्रशेखर शिंदे यांचेशी श्रावणीचा विवाह झाला.ते बेकरीमधे काम करायचे.एक मुलगी झाली आणी २०१० साली अचानक तिचे मिस्टर कुठेतरी निघुन गेले.आजतागायत त्यांचा काहीही ठावठीकाणा नाही.मुलगी हिंदवी आता १४ वर्षांची झाली.यावर्षी तिने १०वीची परीक्षा दिली आहे.

श्रावणी एकटी मुलीचा सांभाळ करते.सध्या ती घरघंटी चालवते.शिलाईमशीनवर थोडफार काम करते.साडीला फाऊल बिडींग करुन व खाद्य पदार्थ विक्री करून उदरनिर्वाह चालवते.तिच्या बहीणी तिला गरजेला मदत करत असतात. २०२० साली श्रावणीची आई निधन पावली तिचा आधारच निघुन गेला.काठी घेवुन चालताना चांगल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर हात ठेवुन चालावे लागे.त्यामुळे गुडघ्यावर प्रेशर येवुन तिथे फ्रॅक्चर झाले.त्याचे २०२०साली अॉपरेशन करावे लागले.आता चालण्यावर बंधन येवु लागली.फार लांब चालणे शक्य नसल्याने व्हिलचेअर वापरावी लागत आहे.बाहेरची कामं करणेसाठी ईतरांवर अवलंबुन रहावे लागायला लागले.ईलेक्र्टोनिक गाडीसाठी श्री अशोक भुस्कुटे सर यांच्याद्वारे आरएचपी फाउंडेशन रत्नागीरीचे अध्यक्ष श्री सादिक करीम नाकाडेंशी संपर्क साधुन सगळी माहिती दिली.

आर एच पी फाउंडेशन रत्नागिरी यांच्या मदतीने आणी अलटीयस कंपनीच्या सहकार्याने नॅसिओ संस्था चेंबुर यांच्या सहाय्याने श्रावणी शिंदेला निओ मोशन गाडी मिळाली.या निओमोशन गाडीमुळे त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे.ती पुर्णत: सेल्फ डिपेंडन्ट बनणार आहे.कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जावुन काम करु शकणार आहे.अर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे.कौटुंबिक परिस्थिती सुधारणार आहे. खुप खुश होती गाडी मिळाल्यावर.श्रावणी आणि तिच्या कुटुंबियांनी आरएचपी फाउंडेशन आणी ईतर सर्वांचेच मनापासुन आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button