
अनारी गावात बिबट्याची दहशत, पाळीव जनावरांसह कोंबड्याही फस्त.
चिपळूण तालुक्यातील अनारी गावात सध्या बिबट्याची दहशत सुरू आहे. विशेष म्हणजे या बिबट्याने आतापर्यंत १० ते १२ पाळीव जनावरांसह कोंबड्या फस्त केल्या असून यामुळे शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झघले आहे. या प्रकारामुळे अनारी गावात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी देखील पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला असून वाडीपासून २ कि.मी. अंतरावर बिबट्याने फस्त गेलेल्या जनावराचे आवशेष ग्रामस्थांना आढळून आले.www.konkantoday.com