
कुवारबांव उड्डाणपुल आता कुवारबाव बाजारपेठेसाठी फायदेशीर ठरणार, प्रस्तावाला लवकरच मंजुरी
मिर्या-नागपूर महामार्गाच्या दरम्यान येणार्या कुवारबाव बाजारपेठेचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. या परिसरातील कामाला वेग आला असून कुवारबावच्या उड्डाणपुलाच्या मंजुरीचा प्रस्ताव लवकरच मंजुर करण्यात येणार असून याची दखल खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असल्याचे कुवारबाव व्यापारी संघटनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यापार्यांच्या मागणीची दखल घेत होणारा उड्डाणपुल हा आता कुवारबाव बाजारपेठेसाठी फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.
मिर्या-नागपूर महामार्ग-१६६ च्या रत्नागिरी तालुक्यातील कामाला आता पावसाळ्यानंतर चांगलाच वेग आला आहे. रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव परिसरातील बाजारपेठ वाचवण्यासाठी व्यापारी संघटनेकडून वारंवार प्रयत्न करण्यात येत आहेत.
या संघटनेच्या मागणीनुसार कुवारबांव बाजारपेठ वाचवण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली आहे. या मागणीनुसार आता उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली येथे पाठवण्यात आला असुन १०१ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याचे व्यापारी संघटनेकडून सांगण्यात येत आहेत.
www.konkantoday.com