भाटे येथील झरी विनायक मंदिराचा ९ला कलशा रोहणधार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ; मान्यवर उपस्थित राहणार

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर प्रसिद्ध श्री झरी विनायक मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्री गणपती पुनःप्रतिष्ठापनेचा सोहळा ७ ते ११ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगणार असून, मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते होणार आहे.भाट्ये येथील कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, आमदार व भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन साळवी, उद्योजक अण्णा सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ९ला गणेशाची व ११ला हनुमंताची पुनःप्रतिष्ठापना होणार आहे. या वेळी अष्ठोदत्त सहस्र कुंभाभिषेक हा धार्मिक सोहळा पुजकांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या निमित्ताने ७ व ८ला दुपारी १ ते ५ या वेळेत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ९ला श्री झरीविनायक मंदिराचा कलशारोहण, मूर्तीची प्रतिष्ठापना व धार्मिक विधी सकाळी १०.२९ वाजता सुरू होणार आहे. दुपारी १ ते रात्री १२ पर्यंत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. १.३० वाजता भजन तर सायंकाळी ७ ते १० या वेळेत महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज प्रथमेश लघाटे यांचा संगीतमय नजराणा सादर होणार आहे. या वेळी हास्यकलाकार प्रभाकर मोरे व दत्तू मोरे यांचाही हास्यमनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. १० ला सायं. ६ वाजता होम मिनिस्टर, ११ला ९.२५ वा. हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वा. महाप्रसाद होणार आहे. सायं. ७ वाजता उत्सव माय मराठीचा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन झरी विनायक मित्रमंडळ भाट्ये माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button