
चिपळुणात गुढीपाडव्यानिमित्त वाशिष्ठीला वाहिली दारूची धार, भोई समाजाची अनोखी परंपरा.
चिपळूण येथील भोई समाजाने आपल्या परंपरेनुसार गुढीपाडव्यानिमित्त रविवारी वाशिष्ठी नदीला दारूची धार वाहिली.कोकणात वेगवेगळ्या सणांना अनोख्या परंपरा पहायला मिळतात. यातून गोवळकोट किनारी वसलेला भोई समाज गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्यानिमित्त वाशिष्ठी नदीला दारूची धार सोडतो.
भोई समाजाचा उदरनिर्वाह वाशिष्ठी नदीवर अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण केला जातो. तर गुढीपाडव्यानिमित्त दारुची धार सोडली जाते. त्यानुसार रविवारी बच्चे कंपनीसह अनेक नागरिकांनी बोटीतून वाशिष्ठीची सफर करत एका विशिष्ठ ठिकाणी जावून दारूची धार सोडली. या परंपरेला रंगमाली असे म्हणत असल्याचे यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.www.konkantoday.com