
चाफे गावाजवळील निवळी-जयगड मार्गावर भीषण अपघात, ट्रक ट्रकने स्कूटर स्वाराला उडवून 400 फूट फरपटत नेले दुचाकी स्वाराचा मृत्यू संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला
अपघातांना आळा बसावा यासाठी नियमावलीत बदल करून देखील मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत त्यामुळे अनेक वेळा निष्पाप लोकांचा बळी पडत आहे असाच अपघात आज सकाळी घडला आहे
निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे मंगळवारी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे (खंडाळा, वाटद) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने अपघात करणारा ट्रक पेटवून दिला.
, हा अपघात चाफे गावाजवळील निवळी-जयगड मार्गावर घडला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलस्वाराला तब्बल चारशे फुट फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हा खंडाळा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु ट्रकच्या बेदरकार चालकामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखीनच गंभीर बनवली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांच्यात अजूनही संतापाचे वातावरण आहे नियम तोडून बेफान वाहने चालविण्यांवर कारवाईची मागणी होत आहे