
रत्नागिरीत विसर्जनाच्या वेळी अडीच टन निर्माल्य जमा
दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरी नगर परिषद रोटरी क्लब आणि शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयांने निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविला त्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला.या वर्षी विसर्जना वेळी अडीच टन निर्माल्य गोळा करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने विशेष व्यवस्था केली होती. आलेले निर्माल्य तीन प्रकारात गोळा करण्यात आले. ओला, सुका आणि प्लॅस्टिकचा अशी वर्गवारी करण्यात आली.ओल्या निर्माल्यावर भाटे संशोधन केंद्रात प्रक्रिया करून जैविक खत तयार केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली. पूर्वी निर्माल्य समुद्रात टाकले जात होते त्यामुळे ते वाहून किनाऱ्यावर परत येत असे आता निर्माल्य गोळा करण्याच्या उपक्रमाला नागरिकांनीही प्रतिसाद दिल्यामुळे निर्माल्य समुद्रात न टाकता या संस्थांमार्फत गोळा केले जाते. यामुळे समुद्रात प्रदूषण कमी झाले आहे.
www.konkantoday.com