कुसुमताई सहकारी पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंद जाहीर; आर्थिक वर्षात 50 लाख 55 हजारांचा नफा

रत्नागिरी । कोकणातील अग्रणी असलेल्या कुसुमताई सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपला वार्षिक ताळेबंद जाहीर करतानाच गतवर्षीपेक्षा यंदा थकबाकीदारांचे प्रमाण कमी झाले असल्याचे जाहीर केले आहे. तर पतसंस्थेला या आर्थिक वर्षात 50 लाख 55 हजारांचा नफा झाला आहे. सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षाचा आर्थिक ताळेबंद आज ३१ मार्च रोजी कुसुमताई सहकारी पतसंस्थेने जाहीर केला. त्यानुसार या आर्थिक वर्षाखेर पतसंस्थेचे भाग भांडवल ६८ लाख ७४ हजार इतके आहे. पतसंस्थेच्या ठेवी ३९ कोटी ८४ लाख इतक्या असून गेल्या वर्षात कर्ज वाटप ३१ कोटी ९४ लाख रुपये इतके झाले आहे. पतसंस्थेने विविध क्षेत्रात केलेली गुंतवणूक ११ कोटी ७५ लाख इतकी असून यंदा पतसंस्थेने ५० लाख ५५ हजार इतका नफा मिळवला आहे.

यंदा पतसंस्थेची थकबाकी २. ८७ टक्के इतकी आहे. मात्र गेल्यावर्षी पेक्षा थकबाकीचे प्रमाण कमी झाले असून थकबाकीदारांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. कुसुमताई सहकारी पतसंस्था नेहमीच सामाजिक उपक्रमात सुद्धा अग्रणी असते. त्यातही नैसर्गिक आपत्तीमध्ये रत्नागिरीतील ग्रामीण भागाला सहकार्य करण्याचे पतसंस्थेचे सदैव धोरण असते. पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासालाही उत्तम प्रतिसाद मिळतो तर ठेवीदारांचा सातत्याने पतसंस्थेवर असलेल्या विश्वासामुळेच ये यश मिळत असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष नाना शिंदे, उपाध्यक्ष सतीश शेवडे आणि संचालक मंडळाने केले असून सभासदांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button