
ऐकावं ते अजबच! कावळा; जो मारतो आई, काका अशी हाक!
माणसाप्रमाणं बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का? कावळा बोलतो यावर तुमचा देखील विश्वास बसत नाही ना? पण हे सत्य आहे. काळ्या नावाचा आणि नखरेल पणे मनुष्य बोली बोलणारा कावळा शहापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारं गारगांव येथे आहे.या गावात राहणारे मंगल्या पांडू मुकणे यांच्या मुलांना तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात घराच्या जवळ कावळा सापडला होता.त्यावेळी तो अवघा काही दिवसांचा होता. त्याला मुलांनी अन्न-पाणी खाऊ घालून कसा बसा लहानाचा मोठा केला. मंगल्याची पोरं त्या कावळ्याला काळ्या नावाने हाक मारतात. या कावळ्याला या कुटुंबाचा चांगलाच लळा लागला. तो त्यांच्या घरातील सदस्यां प्रणाणे त्यांच्या घरी राहू लागला. संपूर्ण घरात फिरणं, बाहेर जाणं परत घरी येणं. असा त्याचा रोजचा दिनक्रम आहे. घरातील सदस्यांना तर त्याचा लळा लागलाच आहे.
पण घरातील कुत्री व कोंबड्यांना ही तो हवा-हवासा वाटू लागला आहे. त्याला कुणी धरण्याचा प्रयत्न केला तर कुत्री त्या व्यक्तीच्या अंगावर जावून जातात.बोलक्या कावळ्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीमात्र गेली दोन-चार महिन्यापासून या काळ्या नावाचा कावळा मनुष्य वाणी बोलू लागला आहे. तो चक्क बाबा, आई, काका, ताई दादा दीदी, हट अशा प्रकारे घरातील सर्वांना हाक मारू लागला आहे. त्यापुढे तो संवाद माणसांसोबत देखील साधत आहे. जसे प्रश्न करू तशी उत्तरे देखील देत आहे. मंगल्याच्या मुलीच्या अंगावर बसणे, कपडे शिवतांना तिच्या मशिनवर जाऊन बसणे. घरी बाहेरची व्यक्ती आली तर तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे. या कावळ्याचं स्थानिकांना नवलच वाटत आहे.