राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत मनसे अंमलबजावणी मराठी भाषेच्या वापराबाबत प्रमुख बँकांना निवेदन

रत्नागिरी :- रत्नागिरीतील प्रमुख बँकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने व मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रमुख बँकातील दैनदिन कामकाज हे मराठी भाषेतच झाले पाहिजे हे ठणकावून सांगून सदरहू बँकेच्या व्यवस्थापकाना निवेदन देण्यात आले. तसेच काही अमराठी बँक कर्मचाऱ्यांना मराठी भाषा शिकण्याचे निर्देश देऊन त्यांना “बाराखडी” मनसेतर्फे देण्यात आली.मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर केलेल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार अन्य भाषा चालणार नाही, असे ठणकावून सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे, असे सक्त आदेश काढले आहेत; मात्र तरीही महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्येदेखील मराठीचा वापर होताना दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका मनसे तर्फे प्रमुख बँकांमध्ये जाऊन तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेण्यात आली. बँकांच्या व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर करण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील ग्राहकांशी मराठीत संवाद साधावा ,याबाबत शांततापूर्ण निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली.याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, तालुका सचिव ॲड अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, सौरभ पाटील, महिला सेना तालुका सचिव सौ आकांक्षा पाचकुडे, विभाग अध्यक्ष अक्षय मोरे, जयेश फणसेकर, सोम पिलणकर, प्रफुल्ल पेडणेकर आदी रत्नागिरी तालुका मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button