
जांगडबुत्ता शब्दाचे जनक… सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट काळाच्या पडद्याआड, ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झांचं निधन
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट, ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते 68 वर्षांचे होते. जांगडबुत्ता या शब्दाचे जनक म्हणून डॉ मिर्झा ओळखले जात.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत.




