
रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथे घरफोडी, ६ लाखांचा मुद्देमाल चोरीस
रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथे चोरट्यांनी बंद घर फोडून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २६ ते २८ जानेवारी दरम्यानच्या काळात घडली. तेजस मोरेश्वर नगराळे (३३, रा. सन्मित्रनगर) यांनी याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये सोने व चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तेजस नगराळे यांचे सन्मित्रनगर येथे घर असून ते सध्या नवी मुंबई येथे वास्तव्य करतात. २६ ते २८ जानेवारी दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्यातरी हत्याराने उचकटून आतमध्ये प्रवेश केला घराच्या बेडरुमधील लोखंडी कपाट उचकटून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली, असे तक्रारीमध्ये नगराळे यांनी म्हटले आहे. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
www.konkantoday.com




