
पुढील महिना हा शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी निर्णायक
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेतवर आणि निवडणूक आयोगाच्या निकालावर सुनावणी घेण्यासाठी तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत तर, ३ ऑक्टोबर रोजी आमदारांच्या अपात्रेतवर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतू, याप्रकरणात विलंब होत असल्याने ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात सोमवारी सुनावणी पार पडली.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याच्या आत कारवाई सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर येत्या ३ ऑक्टोबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. तसेच १० ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी होणार आहे. पुढील महिना हा शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी निर्णायक असून या दोन्ही सुनावण्यांमध्ये शिवसेनेचे भवितव्य ठरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
www.konkantoday.com