
दलित पँथरचे सुरेंद्र सोनवणे यांचा उदय सामंत यांना जाहिर पाठींबा
रत्नागिरी, रत्नागिरी येथे आज दलित पँथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सोनवणे यांनी महायुतीचे रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा उमेदवार उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर दिला.यावेळी बोलताना सुरेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, उदय सामंत यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून दलित पँथर संघटना त्यांच्या पाठीराखेची भूमिका निभावेल. त्यांनी दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की, ते गावोगावी जाऊन उदय सामंत यांच्यासह राज्यातील महायुती मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काम करावे अशा सुचना दिल्या. आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोण लक्षात घेता शिवशक्ती-भिमशक्ती च्या माध्यमातून आम्हाला प्रचार व प्रसार करण्यास राज्यात संधी घ्यावी अशा आशयाचं पत्र देखिली सोनवणे यांनी आज उदय सामंत यांच्याकडे दिलं असल्याचं सांगितलं. यावेळी उदय सामंत यांनी दलित पँथर संघटनेच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.