
चैत्र पाडव्याला मुंबईतील शिवाजीपार्क येथे आयोजित मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी म्हणून एकत्र येण्याची साद घातली.
हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच चैत्र पाडव्याला मुंबईतील शिवाजीपार्क येथे आयोजित मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी म्हणून एकत्र येण्याची साद घातली.आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे,” असं राज ठाकरे म्हणाले.आजोबांचे विचार वाचून दाखवले”आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या 1966 सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका,” असं म्हणत राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच्या पुस्तकातील एक परिच्छेद वाचून दाखवला.
“आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे -गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती ।ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी ।करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।।असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत. – प्रबोधनकार ठाकरे” असा परिच्छेद राज ठाकरेंनी वाचून दाखवला.
कानफाट फोडेन”टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा,” असे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले.मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला…”तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते… आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
राज ठाकरेंनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केले. शिमगा झाला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या रितीने राज्य चालवा. निवडणुका संपल्या, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो. फडणवीस तुमच्या हातात एक चांगले सुसंस्कृत राज्य आलेले आहे. चांगल्या गोष्टीला आमचा निश्चित पाठिंबा असेल. प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारून करा, असा सल्ला दिला.मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला. यामध्ये राज ठाकरे यांनी ओरंगजेब कबरीचा काढलेला वाद, कुंभमेळा, नद्यांची परिस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचे बलिदान आदी विषयांवर भाष्य केले.याचबरोबर भाषणाच्या सुरुवातीला राज यांनी गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया. आज मला खूप बोलायचे आहे. निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोन आले, नेमके आजच आले. याचा अर्थ मला समजतो. जरा जपून, असा खुलासाही राज यांनी केला.