
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर गुढी उभारली. मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर गुढी उभारली. मंत्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गुढीपाडवा म्हणजेच चैत्र प्रतिपदा!दुष्ट प्रवृत्ती व असुरांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरीत दाखल झाले. रामप्रभू अयोध्या नगरीत येताना स्वागत म्हणून अयोध्यावासीयांनी गुढ्या उभारल्या होत्या, हा इतिहास आहे. गुढीपाडवा म्हणून हाच मंगलमय पवित्र सोहळा आपण मांगल्याच्या वातावरणात साजरा करतो. या सणाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.
गुढीपाडवा हा सण प्रत्येक भारतीयाचे व त्यातही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे जणू आनंदपर्वच असते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यश, आरोग्य, समाधान, सौख्य याची गुढी उभारावी, अशी मी ईशवराकडे प्रार्थना करून आपणास अनंत शुभेच्छा देतो असे ते म्हणाले.