
रत्नागिरी जिल्ह्यात ४६ धरणात ४३.३७ टक्के पाणीसाठा.
तीव्र उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील पाणीस्त्रोत झपाट्याने खाली होवू लागले आहेत. रणरणत्या उन्हामुळे आणि तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यावर परिणाम होवू लागला आहे. जिल्ह्यातील ४६ लघु पाटबंधारे प्रकल्प ४३.३७ टक्के (१०२.५३ द.ल.घ.मी.) इतका पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्प असलेल्या नातूवाडी धरणात ४४.६९ टक्के, गडनदी धरणात ८०.७७ टक्के तर अर्जुना धरणात ६६.९१ टक्के इतका पाणीसाठा २८ मार्चच्या अहवालानुसार शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वरमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टँकर धावू लागला आहे. जिल्हास्तरावर आणखीन काही गावांमधून पाणीटंचाई डोके वर काढणार असल्याची स्थिती उभी आहे. त्या दृष्टीने प्रशासन स्तरावरून उपाययोजना आखण्यात येत आहेत. रणरणत्या उन्हाचा कडाका अधिक गडद होवू लागला आहे. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने या प्रकल्पातील पाणीसाठ्यांच्या घटत्या पातळीकडे येथील पाटबंधारे विभागामार्फत कटाक्षाने लक्ष वेधले आहे.www.konkantoday.com