
चिपळूण शहरात १२ कोटींची बोगस कामे झाल्याचा माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचा आरोप.
चिपळूण शहरात गेल्या ३ वर्षापासून १२ कोटी रुपयांची कामे बोगसच झाली असून या कामांची चौकशी करावी, तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची बिले अदा करू नयेत, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मी व माझ्या सहकार्यांनी त्यांच्याकडून १२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यातून शहरात अनेक विकासकामे झाली असून काही कामे आजही सुर आहेत.
मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यामुळे आपण या कामांची चौकशी करावी व तोपर्यंत संबंधित ठेकेदाराची बिले अदा करू नयेत. तसेच २०२२ सालापासून नगर परिषदेत प्रशासकीय कारभार आहे. या काळातही झालेली कामे व सध्या सुरू असलेली कामे बोगस आहेत. त्यामुळे २०२२ सालापासून आजपर्यंत झालेल्या कामांची यादी व त्यामुळे त्या कामाची रक्कम दर्शविणारी माहिती मिळावी, अशी मागणी करीत या कामाची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.www.konkantoday.com