आयपीएल 2025 हंगामाची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूच्या संपूर्ण संघाच्या सत्कार कार्यक्रमात चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये चेंगराचेंगरी दहा जणांचा मृत्यू


बंगळुरू शहरातील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आयपीएल 2025 हंगामाची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूच्या संपूर्ण संघाच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता.मात्र अपेक्षेपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला आल्याने येथे मोठी चेंगराचेंगरी झाली. एकीकडे स्टेडियमच्या आवाराच्या बाहेर मोठी चेंगराचेंगरी झालेली असताना दुसरीकडे मात्र बंगळुरू संघाच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या थाटात घेण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विराट कोहलीने हसत-हसत छोटेखानी भाषण केले.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले. चिन्नास्वामी स्टेडियमची आसनक्षमता ही फक्त 40 हजारांची आहे. मात्र या कार्यक्रमाला तब्बल 5 लाख लोक आले होते. यातील बहुतांश चाहते हे तरुण होते. याच कारणामुळे गर्दी अनियंत्रित झाली. यातच पोलिसांनीही गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यामुळे गर्दी जास्तच अनियंत्रित झाली. यामुळे बघता-बघता स्टेडियम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण यात जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button