
वाढत्या तापमानामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात
कोकणचे अर्थकारण आंबा पिकावर अवलंबून आहे. मात्र हेच आंबा पीक उष्णतेमुळे धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये कमालीची वाढ होवून ते सुमारे ३९ अंशापर्यंत पोहोचले आहे. त्याचा आंबा-काजू पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. आधीच विविध कारणांमुळे आंबा-काजू बागायतदारांच्या उत्पन्न व खर्चाचे गणित बिघडलेले असताना आता तापमान वाढीमुळे होणार्या आर्थिक नुकसानीचे चटकेही बागायतदारांना सहन करावे लागत आहेत. त्यामुळे बागायतदार चिंतेत सापडले आहेत.
हवामानामध्ये कमालीचा बदल झालेला पहायला मिळत आहे. रात्री गारवा तर दिवसभर प्रचंड उष्णता असे वातावरण राजापूर तालुक्यात पहायला मिळत आहे. या हवामान बदलामुळे शेतकरी आंबा उत्पादनापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवसागणिक वाढणार्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम आंबा, काजू पिकावर दिसू लागला आहे.www.konkantoday.com