
चिपळुणात मद्यपी कारचालकाचा प्रताप, अनेक दुचाकींना उडवले.
चिपळूण शहरातील परांजपे हायस्कूल, चिंचनाका मार्कंडी आदी भागात मद्यपी कारचालकाने अनेक दुचाकींना बुधवारी रात्री उडवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. बुधवारी रात्री या कारचालकाने प्रथम दुचाकीस्वारांना परांजपे हायस्कूल परिसरात उडवले. त्यानंतर चिंचनाका येथे माय-लेकांंच्या दुचाकीला धडक दिली. तेथून मार्कंडी येथे एका दुचाकीला धडक देवून पुढे जात असताना रावतळे येथे त्याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. व त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. www.konkantoday.com




