
संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रूक येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रूक येथील ५० वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. सुनिता यशवंत सुर्वे असे मृत महिलेचे नाव आहे. सुनिता सुर्वे या रविवारी घराच्या अंगणामध्ये लाकडे लावण्याचे काम करत होत्या. अचानक त्यांना सर्पदंश झाला. सुर्वे यांना तत्काळ देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवासादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून सुनिता सुर्वे यांना मृत घोषित केले. सायंकाळी सुर्वे यांच्या पार्थिवावर निवे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा असा परिवार आहे. सुनिता सुर्वे या मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने मुलावरील आईचे छत्र हरपले आहे.www.konkantoday.com