
आबांच्या आठवणीने उदय सामंत गहिवरले….!
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगली दौऱ्यावर असताना अंजनी येथे स्वर्गीय आर.आर. (आबा) पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि काही वेळ त्यांच्यासोबत चर्चा केली.आबांच्या आठवणींनी मन भारावून गेले.

माझ्या राजकीय सुरुवातीच्या काळात ज्यांनी मला आशीर्वाद दिले आणि पाठबळ दिले, त्यात अग्रस्थानी आबांचे नाव आहे. ते माझ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी रत्नागिरीला आवर्जून उपस्थित राहायचे, मला प्रोत्साहन द्यायचे आणि नेहमी योग्य मार्गदर्शन करायचे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आवर्जून सांगितले.मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाही त्यांनी मला “तू जाशील तिथे मोठा होशील” असा आशीर्वाद दिला होता.

आज मी उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना, आबा असते तर त्यांनी नक्कीच माझे कौतुक केले असते आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनही केले असते, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.यावेळी सुमनताई आणि आबांच्या मातोश्रींना भेटून मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे मन गहिवरून आले. आबांचा संघर्ष, त्यांची दूरदृष्टी आणि समाजसेवेची तळमळ आठवून मनाला नवी ऊर्जा मिळाली असून आबांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजासाठी चांगले कार्य करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील, असे अभिवचन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पाटील कुटुंबियांना दिले.
