सिंधुदुर्गच्या समुद्रात निवती येथे पाणबुडी प्रकल्प साकारण्याबरोबर पर्यटकांना निवासासाठी रूम्स उपलब्ध करून देण्याकरिता क्रुझ सिप्स अँकर उभारणार.

सिंधुदुर्गच्या समुद्रात निवती येथे पाणबुडी प्रकल्प साकारण्याबरोबर पर्यटकांना निवासासाठी रूम्स उपलब्ध करून देण्याकरिता क्रुझ सिप्स अँकर व्हावा, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया काढण्यात येणार असल्याची माहिती आ.दीपक केसरकर यांनी आंबोली येथे बोलताना दिली. आंबोली येथे हॉटेल ग्रीन पार्कमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जिल्हाप्रमुख संजू परब, विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्रेमानंद देसाई, नंदू शिरोडकर उपस्थित होते. आ. केसरकर म्हणाले, सुमारे जिल्ह्यात दरवर्षी 3200 कोटीची काजू बोंडे वाया जातात. या काजू बोंडापासून पल्प तयार करणारी मशिनरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे. ब्राझील देशाने काजू प्रक्रिया उद्योगात अनेक प्रकारची संशोधने केली आहेत.

हे ब्राझीलचे तंत्रज्ञान भारतात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प निवती बेटावर सुरू करण्यात येणार असून याठिकाणी स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. तर क्रुझ सिप्स अँकर उभारून पर्यटकांना त्या ठिकाणी राहण्याची सोय करण्याचा मानस असून त्यासाठी राज्य शासन लवकरच निविदा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button