
अपेक्षित पाऊस न झाल्याने दापोलीत तीन दिवसाआड पाणीपुरवठा
दापोली धरण परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने दापोली नगर पंचायतीकडून शहराला तीन दिवसाआड सध्या पाणीपुरवठा सुरू असल्याचे समोर आले आहे. पावसाळा सुरू झालेला असला तरी नद्या-नाल्यांनाा पाणी झालेले नाही. यामुळे कोडजाई नदी व नारगोली धरणात पाणीसाठा योग्य झालेला नसल्याने पाण्याचे नियोजन करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा शहरवासियांना सुरू करण्यात आला आहे.दापोली शहराची लोकवस्ती मोठी असल्याने पाण्याची मागणीही मोठी आहे. मात्र एप्रिल महिन्यापासून शहरवासियांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. यावर्षी देखील परिस्थिती पेंडींग आहे. त्यामुळे कोडजाई नदी व नारगोली धरणातून पाणी वापरण्यात येते. मात्र पावसाळा सुरू झालेला असला तरी अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यातही दापोली शहरवासियांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. www.konkantoday.com