
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी आनंद त्रिपाठी.
रायगड येथील अन्नत्याग आंदोलनस्थळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत कोकण विभागाचे अध्यक्ष सुरेश मोकल यांनी रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली. दिव्यांग मंत्रालयाचे जनक व संस्थापक अध्यक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी आनंद त्रिपाठी तर जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश पोस्टुरे यांची नियुक्ती करण्यात आली.उत्तर जिल्हा सचिवपदी सुरेश जोशी, दक्षिण जिल्हा सचिवपदी विनोद करंडे, जिल्हा उपाध्यक्षपदी यशवंत कांबळे व गौतम सावंत, खजिनदारपदी संतोष मालसे, सहखजिनदारपदी विजय कोकाटे, सहसचिवपदी रघुनाथ गोरे, राजापूर महिला आघाडी प्रमुखपदी भाग्यश्री चव्हाण, लांजा महिला आघाडी प्रमुखपदी युसरा पन्हळेकर आदी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.www.konkantoday.com