त्यामुळे विरोधकांना आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही-आमदार सुधीर मुनगंटीवार.

कुणाल कामराने एका स्टँड-अप शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.दिल तो पागल है’ मधील एका गाण्याचे विनोदी विडंबन करून केलेली ही टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याच्याबाबत प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. या शो दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियनविरुद्ध एफआयआर देखील नोंदवला आहे.

त्याच्या आयुष्याची कॉमेडी कराअशात आता भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या आयुष्याची कॉमेडी करावी, असे विधान केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोतलाना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “पोलिसांनी त्याला पकडावे आणि त्याच्या आयुष्याची कॉमेडी करावी. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू शकत नाही. प्रत्येकाला स्वाभिमानाचा अधिकार आहे. केतकी चितळेने कोणाचे नावही घेतले नव्हते तरी तिला ३० दिवस तुरुंगात ठेवले. त्यामुळे विरोधकांना आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button