
रत्नागिरी नगर परिषदेला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस
रत्नागिरी : शहराच्या साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडवरच्या कचर्याला आग लागून परिसरात होणार्या धुराच्या त्रासाची प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेतली आहे. या घनकचर्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून प्रदूषण होणार नाही, याची काळजी न घेतल्यास कारवाई संदर्भातील प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी नोटीस रत्नागिरी नगर परिषदेला बजावली आहे.
साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळच शहरातील कचरा टाकण्यासाठी डंपिंग ग्राऊंड आहे. येथील कचर्याला आग लागून धूर आजूबाजुच्या परिसरात पसरतो. येथे सर्वांना या विषारी धुराचा त्रास होत असल्याने योग्य कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी नगरपरिषदेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन दिले. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कचर्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने असे नगर परिषदेला कळवले आहे.