
रत्नागिरी शहरात एप्रिलपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद
रत्नागिरी शहराला केला जाणारा पाणीपुरवठा २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल आणि दुरूस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.पण येणारी रमजान ईद व गुढीपाडवा यामुळे एप्रिलपासून पाणी कपात करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.येथील शीळ धरणात गतवर्षापेक्षा दुप्पट पाणीसाठा आहे. मात्र, वाढता उष्मा व १५ जूनपर्यंत शहरवासियांवर पाणीटंचाईचे संकट येवू नये यासाठी २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल व दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवन होवून पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेच्या पाणी विभागाने बाष्पीभवनाचा धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. एप्रिलपासून प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.www.konkantoday.com