रत्नागिरीत गोगलगायच्या नवीन प्रजातीचा शोधठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधन.

रत्नागिरी : कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम घाटातील जंगलामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंंडेशनच्या संशोधकांनी गोगलगायच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. रत्नागिरी जिह्यातील अनसुरे गावाजवळ असलेल्या देव गिरेश्वर मंदिराच्या बाजूला असणाऱ्या झाडीत ओलसर पालापाचोळ्यात ही प्रजाती आढळून आली.थिओबालडियस काेंकणेंसिस’ असे नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. गोगलगायची नवीन प्रजाती तिच्या शंख व शंखाच्या झाकणावरच्या काही महत्त्वाच्या वैशिष्टय़ांमुळे तिला वेगळ्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. नव्या प्रजातीच्या शंखाची रचना, लांबी, रुंदी, शंखाच्या तोंडाजवळ असलेली विशिष्ट प्रकारची खाचेची उठावदार कडा आणि शंखाच्या झाकणावर असलेल्या छोट्या काट्यांसारख्या रचना ही वैशिष्ट्ये पश्चिम घाटात आढळणाऱ्या थिओबालडियस ट्रिस्टीस या प्रजातीपेक्षा वेगळी आहेत.

थिओबालडियस काेंकणेंसिसही गोगलगाय रत्नागिरीत देव गिरेश्वर मंदिर (अनसुरे), उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान (चिखली, चिपळूण-गुहागर रस्ता), केशरनाथ विष्णू मंदिर (शेडवई) तसेच रायगड जिह्यात फणसाड अभयारण्य येथे आढळली आहे. या गोगलगाई समुद्रसपाटीपासून 80 ते 240 मीटर उंचीवरील सदाहरित व निमसदाहरित जंगलांमध्ये आढळतात.नवीन प्रजातीवर मोलुस्कन रिसर्च या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. शोधनिबंधाचे लेखक, दहिवडी कॉलेजचे संशोधक प्रा. डॉ. अमृत भोसले, ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अक्षय खांडेकर, मेढा येतील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ओमकार यादव, नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडनचे संशोधक डॉ. टॉम व्हाइट आणि श्रीलंकेतील राजराता विद्यापीठाच्या संशोधिका डॉ. दिनारझार्दे रहीम या सर्व संशोधकांच्या प्रयत्नातून संशोधन करण्यात आले आहे.कोकणच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या अनेक गोगलगाय प्रजाती स्थानिक आहेत. त्या जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. ही प्रजातीही कोकणच्या निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. तिचे संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे.- तेजस ठाकरे, प्रमुख संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button