
प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे समुपदेशन केंद्र स्थापन
रत्नागिरी, दि. 27 : माहे ऑगस्ट/सप्टेंबर 2025 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे शासकीय सुट्टी वगळून रोज सकाळी 10 ते 12 वाजता यावेळेत समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मधू दंडवते औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूरचे प्राचार्य टि. एस. मिसाळ यांनी केले आहे.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपल्या पाल्याला कोठे प्रवेश घ्यावा, याबाबत विचार करताना पालकांची तारांबळ होते. आयत्या वेळी निर्णय घेणे खूप अवघड होते. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत माहे ऑगस्ट/सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे शासकीय सुट्टी वगळून रोज सकाळी 10 ते 12 वाजता यावेळेत समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये प्रवेशासाठी आवश्यक ट्रेड, आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती देण्यात येणार आहे.000