
रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप सडा येथे कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी
रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप सडा येथे कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाली. ही घटना २ मे २०२४ रोजी घडली. अंकिता अनंत चांदोरकर (४६, रा. टिळकआळी, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. अभिषेक आत्माराम चव्हाण (३४, रा. अभ्युदयनगर, नाचणे रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता चांदोरकर या पती अनंत चांदोरकर यांच्यासह दुचाकीवर मागे बसून रत्नागिरी पावस मार्गावरून जात होत्या. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते गोळप सडा येथे आले असता अभिषेक चव्हाण याच्या ताब्यातील कारची त्यांना जोराची धडक बसली. या अपघातात अंकिता चांदोरकर या जखमी झाल्या. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com