
खेड तालुक्यातील कळंबणी येथील सहकार्यास आश्रय देणारा दुसरा बांग्लादेशीही गजाआड.
खेड तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकास आश्रय देणार्या जॉनी मुल्लू मुल्ला (३२, सध्या. रा. खेर्डी, चिपळूण, मूळगाव पाटेश्वरी बांग्लादेश) याच्याही पथकाने सोमवारी रात्री चिपळूण येथे मुसक्या आवळल्या.
मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.अकबर अबू शेख (सध्या रा. कळंबणी, मूळ गाव पडोली बांग्लादेश) याच्या देखील पोलिसांनी १२ मार्च रोजी मुसक्या आवळल्या होत्या. या बांग्लादेशी नागरिकास आश्रय देणार्या चिपळूण येथील व्यक्तीचा येथील पोलिसांकडून शोध सुरू होता.www.konkantoday.com