
खाडीत कालवे काढताना बुडलेल्यां पैकी दुसरा मृतदेहही सापडला
तालुक्यातील सांडेलावगण-कासारी येथे खाडीत कालवे काढताना बुडलेल्यांपैकी दुसऱ्या व्यक्तीचाही मृतदेह आज रविवारी सकाळी त्याच ठिकाणी सापडला. सांडेलावगण-कासारी ग्रुप ग्रामपंचायत विभागातील खाडीवर कालवे काढण्यासाठी गेलेल्या चाफेरी गावच्या दोन ग्रामस्थांचा शनिवारी पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीमध्ये ओहोटीच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडून संतोष पिंपळे व संजय गुरव यांचा मृत्यु झाला हाेता त्यापैकी एकाचा मृतदेह त्याचवेळी सापडला होता. तर संतोष यांचा शोध सुरु होता. आज सकाळी ९ वाजता दुसरा मृतदेह सापडला. बुडालेल्या ठिकाणापासून नजीकच दुसरा मृतदेह सापडला. खाडीतील चिखल आणि कमरेला असलेली कालव्यांची पिशवी यामुळे हा तरुण त्याच ठिकाणी रूतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहेआहे.
www.konkantoday.com