
कोकण रेल्वे संचालकपदी सुनील गुप्ता यांची नियुक्ती.
केंद्राने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन आणि कमर्शियल) म्हणून सुनील गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. गुप्ता १९९८ बॅचचे वरिष्ठ आयआरटीएस अधिकारी आहेत. ते मुख्यालय उत्तर पश्चिम रेल्वे, जयपूर येथे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक म्हणून ते सध्या कार्यरत होते. पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची ही नियुक्ती आहे.कॅबिनेट (एसीसी) आणि रेल्वेमंत्री यांच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
गुप्ता यांना भारतीय रेल्वेवरील ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे व्यवस्थापन करण्याचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांना रेल्वे विभाग आणि मुख्यालयात काम करण्याचाही अनुभव आहे. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. च्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी राजस्थान हेड म्हणून काम करताना त्यांना कंटेनर व्यवसाय हाताळण्याचा अनुभव आहे. त्यांनी विविध प्रशिक्षण देखील घेतले आहे.