
कोकणातील आंबा फळधारणेवर तापमान स्थिर न राहिल्याने विपरित परिणाम होत असल्याचे कृषी विद्यापीठाचे मत
वातावरणातील बदलामुळे कोकणात हापूस सोबत रायवळ आंब्याला देखील दोन वर्षापासून घरघर लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर्षी तापमान स्थिर न राहिल्याने फळधारणेवर विपरित परिणाम दिसून येत असल्याचे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.उशिरापर्यंत पडणारा पाऊस, पुरेशी नसलेली थंडी, मध्येच वाढणारे व कमी होणारे तापमान अशा प्रकारच्या वातावरणामुळे फळझाडांवर परिणाम होवून आंबा उशिराने मोहरला.
हापूसचा यावर्षी आलेख खालावलेला असला तरी त्याच्यासोबत रायवळ देखील मार खात आहे. काही ठिकाणी रायवळ झाडांना पालवी फुटत आहे. तर काही ठिकाणी अजून मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. रायवळच्या एखाद दुसर्या झाडाला कैरी लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र ही कैरी देखील माकडे, वानर खात असल्याने आंब्याची झाडे बोडकी दिसत आहेत.www.konkantoday.com