
कांचन डिजिटल’तर्फे हिंदू संस्कृती आधारित पारंपारिक वेशभूषा स्पर्धा २०२५. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष स्वागतयात्रा निमित्त आयोजन
* *३० मार्च रोजी सकाळी आकर्षक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहनu…..हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा या निमित्त रत्नागिरीत काढल्या जाणाऱ्या भव्य स्वागत यात्रेच्या निमित्ताने येथील प्रसिद्ध कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ च्या माध्यमातून देशातील, महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या गुढीपाडव्या दिवशी रविवार 30 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली असल्याचे छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांनी सांगितले. पारंपारिक वेशभूषा ही भारताच्या समृध्द सांस्कृतिक वारशामध्ये आणि विविध सामाजिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे. ही वेशभूषा देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक भाग आहे. पारंपारिक वेशभूषा ही भारताच्या समृध्द सांस्कृतिक वारशामध्ये आणि विविध सामाजिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे. ही वेशभूषा देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक भाग असून देशाचा इतिहास आणि सामाजिक जीवन दर्शवितात. म्हणून या वेशभूषा स्पर्धा निमित्ताने आपली संस्कृती दर्शन व्हावे हा या स्पर्धेचा हेतू आहे.
30 मार्च रोजी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरात भव्य स्वागत यात्रा निघणार आहे. या स्वागत यात्रा निमित्ताने यावर्षीही कांचन डिजिटल फोटो, रत्नागिरी यांच्यातर्फे पारंपारिक वेषभूषा स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील रत्नागिरीकरांना सहभागी संधी देण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांतून उत्कृष्ट वेशभूषा धारण करणाऱ्यांना आकर्षक बक्षिस देउन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांनी 30 मार्च रोजी सकाळी रत्नागिरी शहरात निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत उपस्थिती दर्शवून या स्पर्धेत सहभागी व्हावे. ही शोभायात्रा संपल्यानंतर लगेचच उत्कृष्ट निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि अधिक माहितीसाठी 8999332757, 9422576736 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मालगुंडकर यांनी केले आहे. त्यानिमित काढण्यात येणाऱ्या भव्य स्वागतयात्रेत आकर्षक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.