
अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरण्याची जबाबदारी पार पाडली मात्र मानधनापासून वंचित.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांचे अर्ज भरल्याचे मानधन ९ महिने अंगणवाडी सविकांना मिळालेले नाही. मात्र अंगणवाडी सेविकांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या यादीनुसार लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या यादीनुसार लाभार्थी महिलांपैकी कुणाच्या नावावर चारचाकी वाहन आढळल्यास अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
दरम्यान जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांचे ४ लाख २१ हजार १३३ अर्ज अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात आले. अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेला ९ महिने पूर्ण होवूनही हे अर्ज भरल्याचे मानधन मिळालेले नाही. महिला व बालविकास विभागाकडून मानधनासाठी २ कोटी १२ लाखांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.www.konkantoday.com