
देवरूखात मोबाईल चोरट्याला नागरिकांनी पकडले.
देवरूख शहरात रविवारी भरलेल्या आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकाचा मोबाईल चोरीचा प्रयत्न एका युवकाने केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पसार झालेल्या युवकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयित युवक आंध्रप्रदेश येथील असल्याचे उघड झाले आहे.खालची आळी परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरतो. घाटमाथ्यावरील भाजीपाला, फळे, कपडे, भांडी आदी व्यापारी देवरूखमध्ये येतात.
एकाच छताखाली सर्व वस्तू मिळत असल्याने तालुक्याच्या कानाकोपर्यातून नागरिक खरेदीसाठी येतात. यामुळे होणार्या गर्दीचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न केला जातो. आठवडा बाजारात आलेल्या नागरिकाचा मोबाईल आंध्रप्रदेश येथील एका १६ वर्षीय युवकाने चोरण्याचा प्रयत्न केला. मोबाईल काढल्याचे लक्षात येताच ग्राहकाने आरडाओरडा केला. या युवकाने मोबाईल तेथेच टाकून पळ काढला. बाजारातील अन्य तरूणांनी या युवकाचा पाठलाग करून त्याला पकडले.www.konkantoday.com