
देवरूखातील मातृमंदिरचे डायलिसीस सेंटर जनतेसाठी आधार -शेखर निकम.
लोकसेवेची ध्यास घेवून मावशी हळबेंनी अहोरात्र काम केले. त्याचा वारसा जपण्याचे काम मातृमंदिर संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. रूग्णांची गरज लक्षात घेवून मातृमंदिर संस्था व चाळके किडणी फाऊंडेशनने डायलिसीस सुविधा देवरूखनगरीत सुरू केली आहे. हे डायलिसीस सेंटर जनतेसाठी आधार ठरेल असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी शहरातील कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केला.शहरातील मातृमंदिर हॉस्पिटलव चाळके किडनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मातृमंदिर येथे डायलिसीस सेंटर सुरू करण्यात आले असून याचे उदघाटन रविवारी आमदार निकम यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी देवरूखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, पल्लवी कोरगांवकर, डॉ. समिधा गोरे, जि.प. माजी सदस्य रोहन बने, प्रदुम्न मान, वैजनाथ जागुष्टे, चाळके किडनी फाऊंडेशनचे अनिल चाळके यांसह विनय पानवलकर, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, सचिन मांगले, नाना कोळवणकर, विलास कोळपे, श्रीकृष्ण जागुष्टे तसेच मातृमंदिर चाळके किडनी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कोवीड काळात मातृमंदिर संस्थेला आमदार निकम यांनी बहुमोल सहकार्य केले. हे ऋण कधीच विसरणार नाही असे हेगशेट्ये यांनी नमुद केले.www.konkantoday.com