
ज्येष्ठ नागरिक प्रभाकर भाटकर यांचे वृद्धापकाळाने निधन
रत्नागिरी : कुवारबाव येथील भू विकास बँक कॉलनीतील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर एकनाथ भाटकर यांचे आज दिनांक 26 मार्च रोजी दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील एसटी वर्कशॉप मध्ये त्यांनी मेकॅनिक म्हणून सेवा केली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज रात्री उशिरा मिरकरवाडा, रत्नागिरी येथील स्मशान भूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे ते सभासद होते उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून येथील विठ्ठल मंदिरात भजनाच्या कार्यक्रमात त्यांचा कायम सहभाग होता. भाटकर परिवार पेठ किल्ला, रत्नागिरी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यामागे पत्नी, विवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. स्वर्गीय प्रभाकर भाटकर यांचे अंत्यसंस्कार त्यांची मुलगी मुंबई येथून रात्री येथे पोहोचल्यानंतर रात्री उशिरा मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत केले जातील.




