
खेड-पन्हाळजे बसफेरीच्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून केला प्रवाशांच्या जीवाशी खेळ.
खेड बसस्थानकापासून रविवारी सायंकाळच्या सुमारास आधीच विलंबाने मार्गस्थ झालेल्या खेड-पन्हाळजे बसफेरीच्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार घडला आहे. सामाजिक कार्यकर्ते निसार सुर्वे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकारानंतर बसचालकाने उर्मटगिरी केल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे.खाडीपट्ट्यातील बहिरवली मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे.
याच मार्गावर बेकायदेशीरपणे उपसा केलेल्या वाळू वाहतुकीसह मार्ग धोकादायक बनला आहे. यामुळे अपघात देखील घडत आहेत. अशा बिकट मार्गावर येथील बसस्थानकातून मार्गस्थ झालेल्या एका बसफेरीचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवून इतर वाहनांना बाजूला काढत होता. यामुळे अनेक वाहने रस्त्याखाली उतरून वाहनांचे नुकसानही झाल्याचे समोर आले आहे.www.konkantoday.com