
आमदार किरण भैय्या सामंत यांच्या “एक कॉल.. प्रॉब्लेम सॉल्व..” ची प्रचिती लांजावासियाना पुन्हा एकदा आली.
लांजा येथील स्टँपवेंडर कदम यांच्याकडे आज स्टँप उपलब्ध न झाल्याने लांज्यातील ग्रामीण भागातील जनतेची खूपच गैरसोय होत होती. स्टँपवेंडर कदम यांनी काल दि. २६ मार्च रोजी स्टँपची मागणी करून देखील, ‘नेट नाही.. तुमची स्टँप मागणी प्रोसेस मध्ये आहे.. आज ही मिळणार नाहीत, ३१ मार्च ची गडबड आहे..’ अशी उडवा उडवीची उत्तरे ट्रेझरी ऑफिसर यांनी दिली.
ग्रामस्थांची होणारी स्टँपअभावी गैरसोय तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी, आमदार किरण भैय्या सामंत यांच्या निदर्शनास दुपारी ३:०० वा. आणून दिली. आणि मोजून १५ मी. त आमदार किरण भैय्या सामंत यांच्या एका कॉल वर त्वरित स्टॅम्प उपलब्ध झाले.कर्तव्यदक्ष.. कार्यतत्पर आमदार किरण भैय्या सामंत यांच्या “एक कॉल.. प्रॉब्लेम सॉल्व..” ची प्रचिती लांजावासियाना पुन्हा एकदा आली.