
चिपळूण नगर परिषद प्रशासनाची सोमवारी मध्यवर्ती बसस्थानक ते भोगाळे परिसरात अतिक्रमण, हटाव मोहीम.
चिपळूण नगर परिषदेने चिपळूण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली आहेचिपळूण नगर परिषद प्रशासनाने सोमवारी (दि. 28) सकाळी मध्यवर्ती बसस्थानक ते भोगाळे परिसरात अतिक्रमणांचा सफाया केला. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकासमोर हातगाडी उभी करण्यावरून दोन व्यावसायिकांचा वाद झाला.हा वाद विकोपाला जाऊन एकमेकांना भिडत रस्त्यावर लोळविण्यापर्यंत घटना घडली. याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर चिपळूण नगर पालिकेनेे सोमवारी गंभीर दखल घेऊन बसस्थानकापासून भोगाळेपर्यंतची अतिक्रमणे उद्ध्वस्त केली.