
पुन्हा एकदा ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दुरुस्ती झाल्यानंतर वाहतूक सुरू
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजही प्रवासात रेंगाळावे लागले
खेड जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत अखेर दीड तासांनी वाहतूक सुरू केली.ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली होती. तर गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेसला अंजणी स्थानकात थांबवून ठेवण्यात आले होते. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करत गाड्या रवाना करण्यात आल्या. दोनच दिवसापूर्वी लांजाजवळ अडवली येथे ओवर हेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने विस्कळीत झाली होती त्यामुळे ती वाहतूक पूर्व पदावर आले असतानाच आज परत प्रकार घडला आहे