
पाणीपट्टी भाडे करूनी थकवली, पाणीपट्टी मागण्यासाठी गेलेल्या मालकिणीलाच मारहाण केली
भाडेकरूकडे थकित पाणीपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या मालकिणीला 3 भाडेकरूनी मारहाण केल्याची घटना खेड एम.आय.बी. हायस्कूलजवळ 22 रोजी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय सुदेश खेडेकर (६९), सार्थक सुदेश खेडेकर व एक महीला (सर्व रा. रोहीदासनगर ता. खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भाडेकरु जन्नत पेडेकर यांचेकडे थकित पाणीपट्टीचे पैसे मागण्याकरिता गेली होती. तेव्हा जन्नत हा फिर्यादी यांना कोणाची पाणीपट्टी मागायला आलीस? नळ तोडतेस का? असे बोलून शिवीगाळ करु लागला व तु ईथे आलीस तर तुला ठार मारुन टाकिन अशी धमकी दिली. तसेच लाकडी दांडक्याने उजव्या हाताच्या मनगटावर फटका मारला. त्यानंतर फिर्यादी घरात आरोपीत घुसले व तिला तुमचा आज निकाल लावतो. अशी जिवे मारण्याची धमकी दिली. टी.व्ही फोडुन घराची नासधूस करुन १५,०००/- रुपयेचे नुकसान केले