
गुहागरात खारवी समाजाचा प्रमुख व प्रलंबित मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा.
गुहागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुहागर पोलीस परेड ग्राऊंडपर्यंत साडेपाच हजारांहून अधिक खारवी समाजातील महिला पुरूषांनी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी समाजाच्या प्रमुख मागण्या व अनेक वर्षे प्रलंबित समस्यांबाबत रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील अखंड तालुका खारवी समाज समितीने शक्तीप्रदर्शन केले. गुहागर पोलीस परेड ग्राऊंडवर सभा घेण्यात आली. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.गेल्या २८ ऑक्टोबरला साखरीआगर येथील मच्छिमार रविंद्र काशीराम नाटेकर यांच्या बोटीरील खलाशी संशयित जयप्रकाश विश्वकर्मा याने हल्ला करून भीषण हत्या कली.
मासेमारी नौकेतील जाळीसह नौकेलाही पेटवून देवून नौका मालकाचे सुमारे दोन ते सव्वादोन कोटींचे नुकसान केले. या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खारवी समाजाने केली. समुद्रामध्ये बुडून मच्छिमारांचा मृत्यू झाला तर किमान सहा महिने कालावधी वाट पाहून त्यांचा मृत्यू घोषित करण्यात यावा.
तातडीची मदत म्हणून दहा लाख रुपये अपघाती मदत देण्यात यावी. मच्छिमारी दुष्काळ जाहीर करून त्यांचा लाभ फक्त नौका मालकांनाच न देता तो सर्व मच्छिमार संस्थांच्या सभासदांना देण्यात यावा अशीही मागणी केली.www.konkantoday.com