
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर सह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर सह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे.
सोमवारी दुपारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांसह गोवा राज्याला अचानक पावसाने झोडापले. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, बांदा, आणि दोडामार्ग तालुक्यातील पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यमार्गांवर उन्माळलेली झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या भागात वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गोव्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी वाहतूक खोळंबली झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहनं अडकली पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याचा बिघाड झाला आहे, आणि अनेक ठिकाणी लाइट बंद पडल्या आहेत.
हवामान खात्याने अधिक पावसाच्या अंदाजाची माहिती दिली आहे, आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने रस्त्यांवर सफाई आणि मदतकार्य सुरू केले आहे. तरीही, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची आणि आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. विजांच्या गडगडडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.